रिजन चेअरमन दिलीप जैन यांच्याकडून मालवण लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक…

⚡मालवण ता.०४-:
लायन्स क्लबचे रिजन चेअरमन दिलीप जैन यांची लायन्स क्लब मालवणला अधिकृत भेट मालवण येथील दैवज्ञ भवनमध्ये संपन्न झाली. यावेळी दिलीप जैन यांनी आपल्या अभिप्रायात मालवण लायन्स क्लबच्या उत्कृष्ट स्वागत, संघभावना, नियोजनबद्ध कार्यपद्धती व भरीव उपक्रमांचे विशेष कौतुक करत अशाचप्रकारे एकजुटीने काम सुरु ठेवावे, अशा शब्दात प्रोत्साहन दिले.

या भेटीनिमित्त आयोजित बैठकीत नियोजित अजेंड्यानुसार कार्यक्रम पार पडला. या बैठकीदरम्यान “Save Water” या विषयावर माहितीपत्रकाचे प्रकाशन करून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात आला. वाढदिवसानिमित्त स्व:खर्चातून सेवाकार्य करणाऱ्या लायन्स क्लबच्या सदस्यांना दिलीप जैन यांच्या हस्ते डिस्ट्रिक्ट पिन लावून सन्मानित करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे रिजन सेक्रेटरी मिलिंद मृदाळे व रमेश रेळेकर उपस्थित होते. यावेळी दिलीप जैन व मिलिंद मृदाळे यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. या भेटीनिमित्त लायन्स क्लबकडून फातिमा कॉन्व्हेन्ट मधील मुलांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश प्रभूलकर व मिताली मोंडकर यांनी केले.

You cannot copy content of this page