मालवणात पर्यटक तरुणाचा आकस्मिक मृत्यू…

⚡मालवण ता.०४-:
मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पवन कडू बराटे (वय ३०, रा. वाघळी, जि. जळगाव) या पर्यटक तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत गणेश सुभाष पाटील (वागळी- जळगाव) यांनी मालवण पोलीस स्थानाकात खबर दिली आहे. पवन बराटे हा आपले कुटुंबीय व मित्रपरिवारासह पर्यटनासाठी काल मंगळवारी मालवण तारकर्ली येथे आला होता. त्याला दम्याचा त्रास असल्याने त्यावर त्याचे औषध उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर पवन बराटे याचा चेहरा सुजल्यामुळे औषध घेण्यासाठी तो व त्याचा मित्र जगदीश पाटील गाडीने मेडिकल दुकानामध्ये गेले व तेथे पवन यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी गणेश पाटील हे त्या ठिकाणी गेले असता गाडीमध्ये पवन हा अत्यवस्थ व चेहरा सुजलेल्या स्थितीत दिसून आला, तसेच त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी त्याला मालवण मधील खासगी रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यास सांगितले. त्यानुसार गणेश पाटील व जगदीश पाटील यांनी पवन यास ग्रामीण रुग्णालय मालवण येथील नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पवन हा मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पेडणेकर हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page