Headlines

केसरकर- सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कणकवलीत फटाक्यांची आतषबाजी

⚡कणकवली ता.०९-: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला.त्यात पहिल्या टप्प्यात १८ जणांचा मंत्रिमंडळात सहभाग झाला आहे.या मंत्रिमंडळात कोकणातील सिंधुदुर्गातुन दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यातुन उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.उदय सामंत यांनी शपथ घेताच कणकवलीत जोरदार फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटत आनंद उत्सव साजरा करण्यात आला . कणकवली येथीलछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी…

Read More

रोणापालमध्ये तीन दिवस घरावर झेंडा फडकणार

ग्रामसभेत सरपंच सुरेश गावडे यांचा निर्धार : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ⚡बांदा ता.०९-: आरोग्य, सामाजिक कार्य, सेंद्रिय शेती असे अनेक उपक्रम राबवून देशाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करूया. दि. 13 ते 15 रोजी तीन दिवस प्रत्येकाच्या घरी झेंडा फडकावला पाहिजे असा निर्धार रोणापाल सरपंच सुरेश गावडे व सहकाऱ्यांनी केला. रोणापाल स्वामी दयासागर छात्रालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त…

Read More

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांची आठवण नव्या पिढीला करून द्यावी – ऍड. संतोष सावंत

⚡सावंतवाडी ता.०९-: क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी ९ ऑगस्ट रोजी . क्रांतिदिना निमित्त स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारांना कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यामाध्यमातून अभिवादन करण्यात…

Read More

शेर्ले-मडुरा रस्त्यावर झाड कोसळले

⚡बांदा ता.०९-:पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनने अधिकच जोर धरला. बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले ते मडुरा दरम्यान तांबळघाटी येथे रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प झाली होती. परंतु ग्रामस्थ सुनिल वेंगुर्लेकर यांनी श्रमदानातून सदर झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले-तांबळघाटी येथे सकाळी अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले झाड मधोमध कोसळले. त्यादरम्यान वाहतूक सुरू नसल्याने अनर्थ…

Read More

सावंतवाडी सर्वोदयनगर येथील बंद घर चोरट्यांनी फोडले

घटनास्थळी पोलीस दाखल; अधिक तपास सुरू ⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील सर्वोदय नगर येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिस तपास करत आहेत. परंतु, घरात कोणीही नसल्याने घरातून काय काय चोरीस गेले याची माहिती अद्याप समजू शकली नाही आहे. यावेळी पोलिसांची संवाद साधला असता, घर…

Read More

स्वराज्य महोत्सवातून देशभक्तीचा नारा

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवास आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गितांची धुन वाजवून सर्वांची मने जिंकली. मुख्य आकर्षण ठरलेल्या या पथकाने देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले. यानंतर दायती…

Read More

मंत्रिमंडळ विस्तारात कोकणात ‘थोडी खुशी थोडा गम’!

आमदार नितेश राणेंना स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी : तिघांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ⚡सावंतवाडी ता.०९-: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे युती सरकार सत्तेवर आले होते. परंतु, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या शिवसेना पक्षाच्या वादामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. परंतु, अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला…

Read More

भारताच्या अमृतमहोत्सवाचा सावंतवाडीत राष्ट्रगीताने प्रारंभ

भाजप तर्फे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीत गायन ⚡सावंतवाडी ता.०९-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आज संपूर्ण देशात राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार सावंतवाडी भाजप कडून आज सकाळी संजू परब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद…

Read More

महिला हक्क सुरक्षा जिल्हाध्यक्षपदी डॉ सोनल लेले

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत निर्णय सावंतवाडी : जागतिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची मासिक बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित आपगे यांच्या अनुमोदनानुसार सावंतवाडी येथील डॉ. सोनल लेले यांची सिंधुदुर्ग महिला हक्क सुरक्षा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे जागतिक अध्यक्ष डॉ. संतोष…

Read More

केसरकरानी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडीत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव….

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडीतील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी जेष्ठ नगरसेविका आनोरजीन लोबो, भारती मोरे माजी नगरसेविका दिपाली सावंत शुभांगी सुकी गजानन नाटेकर सुरेंद्र बांदेकर आधी पदाधिकारी उपस्थित होते

Read More
You cannot copy content of this page