Headlines

एसटी मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा…

नगरसेविका मोहिनी मडगावकर: नगरपरिषद अधिकाऱ्यांना दाखवली रस्त्याची दुरवस्था,खड्डे तत्काळ बुजवण्याचे दिले निर्देश..

⚡सावंतवाडी ता.२५-: शहरातील एसटी जाण्याच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही महिला घसरून पडल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभापती मोहिनी मडगावकर यांनी तातडीने नगरपरिषद अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून रस्त्याची पाहणी करून घेतली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यांची डागडुजी त्वरित करावी, अशा सूचना सभापती मडगावकर यांनी दिल्या.
यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये सरचिटणीस मेघना साळगावकर, साक्षी गवस, ज्योती मुद्राळे, मेघा भोगटे, तृप्ती विनोदकर आदींचा समावेश होता. रस्त्यावरील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

You cannot copy content of this page