कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संदीप मेस्त्री, बंडू हर्णे, संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरु वर्देकर, नगरसेवक राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, दादू राणे, भाजपा उपाध्यक्ष संदीप सावंत, इब्राहिम शेख, संतोष पुजारे, सागर राणे, प्रशांत राणे, स्वप्नील चिंदरकर, औदुंबर राणे, सुदाम तेली, शिवा राणे, परेश कांबळी, प्रकाश पारकर, अभय गावकर, आबा कोरगावकर, नयन दळवी, अमजद शेख आदी उपस्थित होते.
बैठकीत स्थानिक पातळीवरील विकासकामे, जनसंपर्क वाढविणे तसेच आगामी काळातील संघटनात्मक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
