Headlines

महिला हक्क सुरक्षा जिल्हाध्यक्षपदी डॉ सोनल लेले

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत निर्णय

सावंतवाडी : जागतिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची मासिक बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित आपगे यांच्या अनुमोदनानुसार सावंतवाडी येथील डॉ. सोनल लेले यांची सिंधुदुर्ग महिला हक्क सुरक्षा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे जागतिक अध्यक्ष डॉ. संतोष बजाज यांच्याहस्ते नियुक्तीपत्र, ओळखपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

डॉ. सोनल लेले या गेली सोळा वर्षे सावंतवाडीमध्ये सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देत आहेत. आयोगाच्या निवडीबद्दल डॉ. लेले यांनी आभार व्यक्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय न्याय आयोगाच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू, पिडीत घटकांना मदत करण्याबरोबरच मानवी मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला अत्याचार, पुरुष अत्याचार, बालशोषण, लैंगिक शोषण, बलात्कार, हुंडाप्रथा, विधवाप्रथा, श्रमिकशोषण, अवयव तस्करी, खोटे गुन्हे नोंदविणे इ. सर्व गोष्टींविरोधात गरजूंना आवश्यक ती सर्व मदत आयोगाच्या माध्यमातून करण्यास तत्पर राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. आयोगाचे महाराष्ट्र प्रदेशात डॉ. विश्वजित आपगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमरदिप आको, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. स्नेहल थोरात व गोवा राज्यांतील आंतर जागतिक महिला हक्क सुरक्षा अध्यक्षा ऐश्वर्या साळगांवकर यांनी डॉ. लेले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

लवकरच आयोगाच्या नियमांनुसार जिल्हा व तालुका कार्यकारिणी नियुक्त करण्यात येणार असल्याचे डॉ. लेले यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page