भाजप तर्फे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीत गायन
⚡सावंतवाडी ता.०९-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आज संपूर्ण देशात राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार सावंतवाडी भाजप कडून आज सकाळी संजू परब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर,केतन आजगावकर सविता टोपले हेमंत बांदेकर परीक्षेत मांजरेकर संदेश टेमकर समीर पालक नितीन गावडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
