आमदार नितेश राणेंना स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी : तिघांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
⚡सावंतवाडी ता.०९-: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे युती सरकार सत्तेवर आले होते. परंतु, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या शिवसेना पक्षाच्या वादामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. परंतु, अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला असून, कोकणातील भाजपच्या एका आणि शिंदे गटाच्या दोन आमदारांना मंत्री पद मिळाले असून, कोकणातून तिघांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे कोकणात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, कोकणातील भाजपचे फायर ब्रँड म्हणून ओळख प्राप्त असलेले युवा आमदार नितेश राणे यांना या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या कोकणात ‘ थोडी खुशी थोडा गम’ असे वातावरण स्पष्ट दिसून येत आहे.
यावेळी भाजप आणि शिंदे गट समर्थकांकडून फटाके फोडून आणि मिठाई वाटप करण्यात आली असली तरी आपल्या नेत्याला मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
