केसरकर- सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कणकवलीत फटाक्यांची आतषबाजी

⚡कणकवली ता.०९-: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला.त्यात पहिल्या टप्प्यात १८ जणांचा मंत्रिमंडळात सहभाग झाला आहे.या मंत्रिमंडळात कोकणातील सिंधुदुर्गातुन दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यातुन उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.उदय सामंत यांनी शपथ घेताच कणकवलीत जोरदार फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटत आनंद उत्सव साजरा करण्यात आला .

कणकवली येथील
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे,भास्कर राणे,माजी नगरसेवक भूषण परुळेकर,संदीप खानोलकर,शेखर राणे,संदेश सावंत,सुनील पारकर आदींसह शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

You cannot copy content of this page