*मालवण नगरपालिकेने आयोजित केलेल्या समूह राष्ट्रगान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उपक्रमात लायन्स क्लब मालवणने घेतला सहभाग

मालवण (प्रतिनिधी)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेने आज मंगळवारी आयोजित केलेल्या समूह राष्ट्रगान कार्यक्रमात लायन्स क्लब मालवणने सहभाग घेतला. लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी मालवण मेढा येथील दैवज्ञ भवनच्या पटांगणात एकत्र जमून सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीत म्हणत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, सौ. मीना घुर्ये, सौ. नीलम मयेकर, सौ. पल्लवी खानोलकर, महेश अंधारी, विराज आचरेकर, राजा शंकरदास, महेश कारेकर, अरविंद सराफ, गणेश प्रभुलकर, उमेश शिरोडकर, सौ. कल्पना सारंग, सौ. दिव्या कोचरेकर, सौ. हिमानी गायकवाड, सौ. मालती काळे आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page