क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांची आठवण नव्या पिढीला करून द्यावी – ऍड. संतोष सावंत

⚡सावंतवाडी ता.०९-: क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी ९ ऑगस्ट रोजी . क्रांतिदिना निमित्त स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारांना कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यामाध्यमातून अभिवादन करण्यात आले.

कविवर्य केशवसुत कट्टा येथे कोमसाप सदस्यांनी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारांच्या स्मृतीस उजाळा दिला यावेळी.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा होत आहे. यानिमित्ताने हर घर तिरंगा.अभियानात आपण सर्वजण सहभागी होऊन या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे या परंपरेची गाथा सांगणारानवा अध्यायस्वरूपात पुस्तिकात्यामध्ये हुतात्मा तसेच स्वातंत्र्यवीर.अनेक लढ्यात सहभागी घेतलेल्याशूर वीरांचा शोध घेऊन लवकरचसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहास रुपी अध्याय. पुस्तक रूपात मांडण्याचा संकल्पअध्यक्ष एडवोकेट संतोष सावंतयांनी केला आहे.

You cannot copy content of this page