⚡कुडाळ ता.२४-: पाट हायस्कूल हरित सेने मार्फत विद्यालयात विविध पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जातात. याचबरोबर पर्यावरण विषयक दिनविशेष साजरे केले जातात. यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत बियांचे संकलन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गोळा केलेल्या बिया त्यांच्यापासून सीडबॉल बनवण्याचा उपक्रम विद्यालयात घेण्यात आला.
फणस, आंबा, जांभळ, इतर जातीचे बियांचे संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्यामुळे हरित सेनेच्या विद्यार्थ्यां मार्फत एक हजार सीडबॉल तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तालुका कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मयुरेश दळवी, अजित म्हैस्कर, स्मित कोळकर, मनीष कमेरिया, सोनू कुमार, उज्वल तोंडवळकर या विद्यार्थ्यानी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे परसबाग लागवड आणि बगीचा सुशोभीकरण याचेही मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिक घेतले.
या उपक्रमामध्ये हरित सेनेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, जि प सदस्या यज्ञा साळगावकर, हरित सेना प्रमुख संदीप साळसकर, दीपिका सामंत, सागर चव्हाण, मनीषा साटम या सर्वांचा सहभाग होता.
पाट हायस्कूल मध्ये हरित सेने मार्फत सीडबॉल बनवण्याचा उपक्रम…
