Headlines

फेसबुकद्वारे दोडामार्ग नगरपंचायतची बदनामी

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची पोलिसांत तक्रार ⚡दोडामार्ग ता.१५-: दोडामार्ग नगरपंचायतची फेसबुकवर बदनामकारक पोस्ट टाकल्या प्रकरणी नगरपंचयातचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक आदींनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील सावंतवाडा येथील पांडुरंग मधुकर खांबल यांच्या विरुद्ध ही तक्रार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.दोडामार्ग शहरातील बाजारपेठेमधील पिंपळेश्वर देवस्थानानजिकची मोरी मातीने माखली असून त्यामुळे रस्त्यावर पाणी…

Read More

खो खो किशोर गट निवड चाचणी ८ ऑक्टोबर रोजी

मालवण कन्याशाळा येथे आयोजन मालवण ता.१५-: जिल्हा खो-खो असोसिएशनची २०२२-२३ ची किशोर-किशोरी गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मालवण येथील धुरीवाडा कन्या शाळेत ८ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. या स्पर्धेतून ३७ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किशोर-किशोरी संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

मालवण काँग्रेसच्या गणपती आरास सजावट स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

लवकरच निकाल जाहीर करणार ⚡मालवण ता.१४-: गणेश चतुर्थी निमित्त माजी गृहमंत्री व जिल्हा काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कमिटी तर्फे प्रत्येक तालुक्यातगणपती आरास सजावट स्पर्धा घेण्यात आली. काँग्रेस जिल्हा कमिटी व मालवण तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मालवण तालुक्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून तालुक्यतील…

Read More

नांगरभाट शिवकालीन पोखरबावचे रुपडे पालटणार

शिवप्रेमी, ग्रामस्थ श्रमदानातून करणार डागडुजी;१८ रोजी पहिला टप्पा मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील साळेल येथील मुख्य एसटी बसथांब्यानजीक असलेली पोखरबाव अर्थात शिवकालीन विहीर गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिली आहे. दयनीय अवस्थेत असलेला हा शिवकालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी श्रमदानाच्या माध्यमातून विडा उचलला आहे. प्राथमिक टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी श्रमदानातून विहिरीची डागडुजी व साफसफाई केली जाणार…

Read More

भंडारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सभा १८ रोजी

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मालवण या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल लीलांजली येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील स्ट्रेचर, व्हील चेअर केल्या दुरुस्त

सामाजिक बांधिलकीतून सावंतवाडीतील व्यक्तींनी राबविला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.१४-: उपजिल्हा रुग्णालयातील मोडलेल्या अवस्थेत असणाऱ्या दोन स्ट्रेचर आणि दोन व्हीलचेअर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विनामूल्य रीपेरींग करून देण्यात आल्या आहेत. या कामासाठी सामाजिक बांधिलकीचे रवि जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्याम हळदणकर, प्रसाद कोदे तसेच वेल्डर व फिटर विनोद केसरकर, आनंद भोगळे व अकलेश यांनी सहकार्य केले. आज…

Read More

बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश पावसकर यांचे निधन

⚡कणकवली ता.१४-:जि. प. बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कणकवली तालुक्यातील आशिये -बाणेवाडी येथील रहिवाशी सुरेश लक्ष्मण पावसकर ( वय 69 )यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते परिसरात वारकरी म्हणूनही परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, दोन भाऊ, बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक प्रभाकर पावसकर यांचे ते बंधू…

Read More

गणेश चतुर्थी काळात वाहतुकीचे नियोजन करणा-या पोलिसांचा सत्कार

वेंगुर्ला युथ संस्था व लोकराज्य मंचच्यावतीने सत्कार ⚡वेंगुर्ला ता.१४-: गणेश चतुर्थी काळात वाहतुकीचे उत्तम नियोजन करणा-या पोलिसांचा वेंगुर्ला युथ संस्था व लोकराज्य मंचच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Read More

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी स्वाती पाटील यांची निवड

⚡बांदा ता.१४-: पंचायत समिती सावंतवाडी शिक्षण विभाग आयोजित 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य या स्पर्धा प्रकारात कास नं.1 शाळेच्या शिक्षिका सौ.स्वाती पाटील यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे 12ते 13 सप्टेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या या विज्ञान प्रदर्शनात स्वाती…

Read More

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस होणार विविध उपक्रमांनी साजरा

वेंगुर्ले भाजपचा निर्णय वेंगुर्ला प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस वेंगुर्ला भाजपातर्फे विविध सेवा कार्य आयोजित करुन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर व कोवीड लसीकरण, कृत्रिम अवयव वितरण, वयोश्री योजनांचे कॅम्प, बुद्धीजीवी संमेलन, व्होकल फॉर लोकल, स्वच्छ भारत अभियान, जल ही जिवन, वृक्षारोपण, तलाव स्वच्छ करणे, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, आत्मनिर्भर…

Read More
You cannot copy content of this page