मालवण कन्याशाळा येथे आयोजन
मालवण ता.१५-: जिल्हा खो-खो असोसिएशनची २०२२-२३ ची किशोर-किशोरी गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मालवण येथील धुरीवाडा कन्या शाळेत ८ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. या स्पर्धेतून ३७ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किशोर-किशोरी संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो असोसिएशनचे अस्थाई समिती अध्यक्ष संदीप तावडे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार्या संघांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत उपस्थित रहावयाचे आहे. ही स्पर्धा कन्या शाळा, धुरीवाडा येथील मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत ३ नोव्हेंबर २००८ नंतर जन्मलेले किशोर-किशोरी खेळाडू सहभागी होऊ शकतील. खेळाडूचे वय, उंची (सेंटीमीटर), वजन यांची बेरीज २१५ होणे आवश्यक आहे. खेळाडूंनी १०० रुपये नोंदणी शुल्क भरावयाचे आहे. ७ ते ८ ऑक्टोबर सकाळी ९ वाजेपर्यंत प्रवेश स्विकृती राहील. काही कारणास्तव खेळाडूंचे नावासहीत प्रवेश अर्ज मुदतीत पाठविणे शक्य नसल्यास तसे लेखी कळवावे. खेळाडू नववी अथवा त्या खालील वर्गात शिकत असला पाहिजे. प्रवेश अर्ज शाळा, क्लब, संस्था यांच्या लेटरहेडवर देणे आवश्यक आहे. किशोर-किशोरी खेळाडूंचा जन्म तारखेचा मुळ दाखला झेरॉक्स प्रतीसह आणणे आवश्यक आहे. इतर नियम प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर सामानाधिकार्यांना दिसेल असा क्रमांक असणे गरजेचे आहे. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. खेळाडूंचे मुल्याकन स्पर्धेच्या ठिकाणी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी केले जाईल. या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था केलेली नाही. स्पर्धेत सहभागी होणार्या संघांनी आपला प्रवेश अर्ज ७ ऑक्टोबरपर्यंत या tausandeep@gmail.com ई-मेलवर पाठवावा असे आवाहन श्री. तावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२४३०७९९ यावर संपर्क साधावा.
