बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश पावसकर यांचे निधन

⚡कणकवली ता.१४-:
जि. प. बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कणकवली तालुक्यातील आशिये -बाणेवाडी येथील रहिवाशी सुरेश लक्ष्मण पावसकर ( वय 69 )यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते परिसरात वारकरी म्हणूनही परिचित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, दोन भाऊ, बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक प्रभाकर पावसकर यांचे ते बंधू होत.

You cannot copy content of this page