सामाजिक बांधिलकीतून सावंतवाडीतील व्यक्तींनी राबविला उपक्रम
⚡सावंतवाडी ता.१४-: उपजिल्हा रुग्णालयातील मोडलेल्या अवस्थेत असणाऱ्या दोन स्ट्रेचर आणि दोन व्हीलचेअर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विनामूल्य रीपेरींग करून देण्यात आल्या आहेत. या कामासाठी सामाजिक बांधिलकीचे रवि जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्याम हळदणकर, प्रसाद कोदे तसेच वेल्डर व फिटर विनोद केसरकर, आनंद भोगळे व अकलेश यांनी सहकार्य केले.
आज दोन्ही स्ट्रेचर आणि दोन्ही व्हीलचेअर उपजिल्हा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत. यावेळी जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. संदिप सावंत, डॉ. आकेरकर आदी उपस्थित होते.
