अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचा सभापती अनुराधा नारकर यांनी घेतला आढावा…
⚡दोडामार्ग ता.२७-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी गुरुवारी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देत महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.दौऱ्यादरम्यान उसप, घोडगेवाडी व मोरगाव येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांना देण्यात येणारा पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, बालकांची उपस्थिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची पाहणी…
