Headlines

वेंगुर्ल्यात उद्या जागतिक पर्यटन दिन

⚡वेंगुर्ला ता.२६-: भविष्यात सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी आणि सर्व पर्यटन व्यावसायिकांना एकत्र आणून समान व्यासपिठावर काम करण्याचा प्र्रयत्न सिधुदुर्ग पर्यटन व्यावसायीक महासंघ करणार आहे. याच अनुशंगाने २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत वेंगुर्ला येथील साई दरबार हॉल येथे जागतिक पर्यटन दिन आयोजित केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमाचे…

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने आज शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मातोश्री कला क्रिडा मंडळ-दाभोली नाका, तालुका शिवसेना कार्यालय-सुंदरभाटले, कॅम्प कॉर्नर, तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळ गाडीअड्डा, मठ शिवाजी चौक आणि दाभोली-रेवणकरवाडी येथे नवदुर्गेचे पूजन करण्यात आले.

Read More

सार्वजनिक नवरात्रौत्सव निमित्त बांदा नीमजगा येथे विविध कार्यक्रम

१ आणी ३ ऑक्टोबर कालावधीत आयोजन;संदेश महाले यांनी केले पुरस्कृत ⚡बांदा ता.२६-: सार्वजनिक नवरात्रौत्सव निमित्त बांदा निमजगा येथे शनिवारी १ ऑक्टोंबर आणि दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी संदेश महाले पुरस्कृत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संदेश महाले यांनी केले आहे.

Read More

प्रतिक्षा तावडे यांना ‘राष्ट्रीय फिनिक्स अॅवार्ड – २०२२’ प्रदान

⚡सावंतवाडी ता.२६-: दुर्गा प्रेरणा सोशल फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘राष्ट्रीय फिनिक्स अॅवार्ड २०२२ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ च्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना पणजी येथील हॉटेल जिंजर येथे नुकताच कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोमल रहाटे यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल व मानाचा फेटा अशा स्वरूपाचे प्रदान करण्यात आला. त्यावेळी…

Read More

न्हावेलीत आंबा किड व रोग नियत्रंण मार्गदर्शनास प्रतिसाद

⚡बांदा ता.२६-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत न्हावेली – देऊळवाडी येथे आंबा पुनर्जीवन, आंबा पीक किड व रोग या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमास ग्रामस्थ शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना सहाय्यक प्राध्यापक आंबा विभाग, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, डॉ. एम.पी. कणसे यांनी आंबा पुनरुजीवन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर…

Read More

व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज:माधवराव भांडारी

⚡कणकवली ता.२६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात व्यवस्था परिवर्तनाचे पर्व सुरू आहे.व्यवस्था परिवर्तन ही केवळ एका रात्रीत घडणारी गोष्ट नसून त्यासाठी मोठं नियोजन, मोठी तयारी आणि त्या परिवर्तनाच्या अंमलबजावणीसाठी मोठी हिम्मत लागते. सुदैवाने या सगळ्या बाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आणि कर्तृत्वात आहेत.व्यवस्थेतील हे सकारात्मक बदल जाणीवपूर्वक जनतेपर्यंत जायला हवेत,त्याची चर्चा व्हायला हवी.अन्यथा…

Read More

सिंधुदुर्गची प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता आदर्शवत

अजय कांडर;आहे भविष्य अपुल्या हाती ग्रंथाचे प्रकाशन ⚡कणकवली ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा गुणवंत शिक्षकांनी ‘गुणवंत विद्यार्थ्यांना कसे घडवले जाते’ यासंदर्भातील प्रमिता तांबे संपादित “आहे भविष्य अपुल्या हाती” हे आत्मकथन लिहून महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासमोर आदर्श निर्माण केला आहे. सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाची ही गुणवत्ता राज्यभरातील शिक्षकांच्या दृष्टीने अनुकरणीय आहे. त्यामुळे ज्या अकरा शिक्षकांनी आपली शैक्षणिक वाटचाल कथन…

Read More

लिंगाधारीत समतेला घरातूनच सुरुवात करा

सरिता पवार;गोपुरी येथे नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर शिबिराचा समारोप ⚡कणकवली ता.२६-: स्त्री आणि पुरुष या दोघांनीही माणूसपणाच्या व्याख्येत जगणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथीयांनाही समाजात समान न्याय मिळायला हवा. लिंगाधारीत समानतेची आपण आपल्या घरातूनच सुरुवात करा, असे आवाहन आदर्श शिक्षिका, कवयित्री सरिता पवार यांनी केले.अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या ‘त्या’ युवकांवर कारवाई करा

मनसेच्यावतीने पोलिसांना निवेदन : सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर घोषणाबाजी ⚡सावंतवाडी ता.२६-: पुण्यात पाकिस्तान च्या घोषणा देणाऱ्या त्या युवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज मनसेच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, यावेळी सावंतवाडीतील पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. देशात झालेला प्रकार चुकीचा असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा….

Read More

साटेलीत गरजूंना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

⚡बांदा ता.२६-: आरोस येथील निखिल आनंद नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत साटेली गावातील अपंग गरजू व्यक्तींना कोकण सम्राट ग्रुपचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या हस्ते गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साटेली गावातील गरजू व अपंग व्यक्तीना मिळालेली मदत खूप मोठी असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. संजय नाईक यांनी निखिल नाईक यांचे आभार मानले.

Read More
You cannot copy content of this page