प्रतिक्षा तावडे यांना ‘राष्ट्रीय फिनिक्स अॅवार्ड – २०२२’ प्रदान

⚡सावंतवाडी ता.२६-: दुर्गा प्रेरणा सोशल फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘राष्ट्रीय फिनिक्स अॅवार्ड २०२२ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ च्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना पणजी येथील हॉटेल जिंजर येथे नुकताच कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोमल रहाटे यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल व मानाचा फेटा अशा स्वरूपाचे प्रदान करण्यात आला.

त्यावेळी व्यासपीठावर प्रा. प्रकाश कदम, अमितकुमार यादव ( संस्थापक अध्यक्ष, शौर्य उद्योग समूह इस्लामपूर) डॉ. पद्मजा खटावकर (सिने अभिनेत्री) व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रतिक्षा तावडे यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page