Headlines

पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या ‘त्या’ युवकांवर कारवाई करा

मनसेच्यावतीने पोलिसांना निवेदन : सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर घोषणाबाजी

⚡सावंतवाडी ता.२६-: पुण्यात पाकिस्तान च्या घोषणा देणाऱ्या त्या युवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज मनसेच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, यावेळी सावंतवाडीतील पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

देशात झालेला प्रकार चुकीचा असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्यांना आपल्या देशातून बाहेर काढा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री संतोष भैरवकर कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मंदार नाईक कुणाल किनळेकर बाबल गावडे दीपक गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत कौस्तुभ नाईक सुरेंद्र कोठावळे प्रवीण गवस आबा चीपकर मनोज कांबळी विष्णू वस्कर वैभव धुरी मंदार सुभेदार आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page