सोनुर्ली येथे साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत होरपळून वृद्ध जखमी
सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद ⚡सावंतवाडी,ता.०६-: सोनुर्ली माऊली मंदिर परिसरात घराच्या बाजूला साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत एक वृद्ध होरपळून जखमी झाले. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. नारायण महादेव म्हापसेकर (६६), असे त्यांचे नाव आहे. दरम्यान त्यांना नातेवाईकांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात…
