४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
⚡मालवण ता.०६-: एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन श्री. दिलीप हिर्लोस्कर आणि डॉ.जुई ऋषीकेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका आकांशा शिरपुटे , माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर , श्वेता ओरसकर, उमेश सांगोडकर , माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर , गुरुनाथ नाईक, प्रकाश रेवंडकर ,अण्णा कारेकर, विनोद रेवंडकर, , हितेंद्र हिर्लोस्कर, अमेय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
हे शिबीर ओरोस रक्तपेढी यांच्या सहकार्याने घेण्यात आले. यामध्ये डॉ.पद्मश्री हळदणकर , सुनील वानोळे, नितीन गावकर, सुरेश डोंगरे, उल्हास राणे यांनी रक्त संकलनाचे काम केले. या शिबिरास माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. या शिबिरास उमेश नेरुरकर, अरविंद ओटवणेकर , गणेश प्रभुलकर , गजानन मालंडकर , चंद्रकांत आचरेकर, विनायक निवेकर, किरण कारेकर, अमित कारेकर, अजित पाटनकर, रामेश बेलवलकर, शैलेश मालंडकर, शिवराज धामापुरकर, कृपेश जामसंडेकर, राजा शंकरदास, नेहा शंकरदास/ कोळंबकर , बबन वाघ, गुटली हिर्लोसकर , केदार देसाई , ललित मेस्त्री, विद्या मेस्त्री, वैभव मेस्त्री , मिलिंद कडू , ऍड. ऋषी देसाई , ऍड. रोहित गरगटे, अभि खानोलकर , राजू कोवळे, किशोर गरगटे, केदार गरगटे , रवींद्र गरगटे, अमित नाईक, गौरव वेर्लेकर, गीतेश वेर्लेकर , राजू गिरकर , नितीन मांणगावकर, नंदा गिरकर , विराज पाटकर , मंदार ओरसकर , अमेय देसाई आणि कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.
