विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची खंत
सावंतवाडी ता.०५-: गोव्या सारख्या ठिकाणी पर्यंटन वाढला असताना मात्र सिंधुदुर्गात हवे तसे वाढल नसल्याची खंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान जो पर्यंत सुविधा वाढत नाहीत तोपर्यंत सिंधुदुर्गाचा विकास होऊ शकत नाही, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. अध्यक्ष नार्वेकर खासगी दौर्या निमित्त सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
तसेच नार्वेकर यांनी पुढे बोलताना सावंतवाडी शहर हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. त्यामुळे हे शहर सुधारण्यासाठी मी सावंतवाडी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून सावंतवाडी शहर स्मार्ट शहर करण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
