मालवण एसटी आगाराचे व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्याकडे कुडाळचा अतिरिक्त भार

राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाच्या नियंत्रकांकडून देण्यात आले पत्र

⚡मालवण ता.०६-:
मालवण एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री. सचेतन बोवलेकर यांच्याकडे कुडाळ एसटी आगाराच्या व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे पत्र राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाच्या नियंत्रकांकडून श्री. बोवलेकर यांना देण्यात आले आहे.

सद्यस्थितीमध्ये कुडाळ एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक रिक्त असून विभाग नियंत्रक कार्यालयाकडून पुढील आदेश होई पर्यंत मालवण आगाराचे कामकाज सांभाळून कुडाळ आगार व्यवस्थापक पदाचे दैनंदिन कामकाज सांभाळावे असे विभाग नियंत्रक यांनी बोवलेकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

You cannot copy content of this page