दोघांचा पोलीस कोठडी मुक्काम वाढला

एकाला न्यायालयीन कोठडी;खलाशी अंतोन आल्मेडा मृत्यू प्रकरण

मालवण दि प्रतिनिधी

मालवण रेवतळे येथील खलाशी अंतोन सालू आल्मेडा मृत्यूप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तिघा संशयितांपैकी लहू भिकाजी जोशी (४८ रा. दांडी, श्रीकृष्णवाडी), नंदकिशोर लक्ष्मण मोंडकर (४५ रा. मोरेश्वरवाडी, वायरी-भूतनाथ ) या दोघांना न्यायालयाने आठ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मार्शल कोजमा डिसोजा ( ५२ रा. मच्छीमार्केट, सोमवार पेठ, मालवण) याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

मालवण रेवतळे येथील बेपत्ता खलाशी अंतोन सालू आल्मेडा याला समुद्राच्या पाण्यात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या निष्कषाप्रत पोलीस यंत्रणा आल्याने बोट मालकासह पाच जणांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या तिघांना न्यायालयाने शनिवार पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली होती पोलीस कोठडीत असलेल्या तिघा
संशयितांची पोलीस कोठडी शनिवारी संपली. शनिवारी तिघांना मालवण न्यायालयात हजर केले असता लहू भिकाजी जोशी (४८ रा. दांडी, श्रीकृष्णवाडी), नंदकिशोर लक्ष्मण मोंडकर (४५ रा. मोरेश्वरवाडी, वायरी-भूतनाथ ) या दोघांना न्यायालयाने आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मार्शल कोजमा डिसोजा ( ५२ रा. मच्छीमार्केट, सोमवार पेठ, मालवण) याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

You cannot copy content of this page