Headlines

ठाकरे शिवसेनेला आम. नितेश राणे यांचा कासरलमध्ये झटका

माजी सरपंच, माजी सभापतींच्या मुलासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश ⚡कणकवली ता.१६-: कणकवली पं. स. चे माजी सभापती कै. प्रमोद सावंत यांचे चिरंजीव ॲड. प्रसाद सावंत, कासरल गावच्या माजी सरपंच सुवर्णा सावंत,कासरल सोसायटी उपाध्यक्षा नेहा सावंत, शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र कोकम, युवासेना शाखाप्रमुख दीपक कुळये यांच्या सह कासरल गावातील शिवसेना कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये…

Read More

अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोलनाका बंद पाडणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनांना टोलमाफी द्या:अबीद नाईक ⚡कणकवली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच वाहनांना कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर कायमस्वरूपी टोल माफी मिळाली पाहिजे. ही राष्ट्रवादी पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. पुणे – नाशिक रोडवर ज्या पद्धतीने चाळकवाडी टोल नाका येथे त्या भागातील सर्व वाहनांना राजस्थान येथील टोल कंपनी च्या माध्यमातून टोलमाफी देण्यात आली आहे. त्याच…

Read More

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

कंटीन्युअस एज्युकेशन प्रोग्रॅम अंतर्गत आयोजन ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्युकेशन प्रोग्रॅम’ (CEP) अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात आरपीडी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील बिल्डिंग मेंटेनन्स या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री.संजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरपीडीचे प्रा.नवनाथ सावंत,…

Read More

रिक्षा आणि टेम्पोत अपघात

रिक्षाचे मोठे नुकसान ⚡सावंतवाडी,ता.१६-: रिक्षा व टेम्पो याच्यात मळगाव येथे अपघात झाला असून यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मळगाव येथे घडला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

Read More

*दोडामार्ग पूर्ण प्राथमिक शाळेत १६ रोजी शतक महोत्सव*

⚡दोडामार्ग ता.१५-: तळकट- दोडामार्ग येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक शाळेला 16 नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी करण्यात आले आहे. यावेळी आजी-माजी विद्यार्थी पालक हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शतक महोत्सव समितीचे मनोहर झेडे, दुर्गाराम गवस यांनी केले आहे. शतक महोत्सवी सांगता समारंभ मे 2023मध्ये होणार…

Read More

देवगड तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी पॅनेलचा एकतर्फी विजय

१५ पैकी १५ जागांवर विजय केला संपादित : शिवसेना-काँग्रेस आघाडीला एकही जागा नाही ⚡देवगड ता.१५-: देवगड तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीत आम.नितेश राणे माजी आमदार अजित गोगटे राष्ट्रवादी नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृवाखालील भाजप राष्ट्रवादी पॅनेलने १५ पैकी १५ जागांवर विजय संपादित केला १५ जागा जिंकून भाजप राष्ट्रवादी आघाडीने एकतर्फी विजय खेचून आणला तर…

Read More

गुरामवाडी ग्रामपंचायत येथे कायदे विषयक शिबिर संपन्न

मालवण दि प्रतिनिधीराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका विधी सेवा समिती व वरची गुरामवाडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यालय, कट्टा येथे कायदेविषयक मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मालवण वकील संघाचे सदस्य रुपेश परुळेकर, सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण, अॅड. प्रदीप मिठबावकर, अॅड. अक्षया वराडकर, माजी सरपंच सतीश वाईरकर, उपसरपंच शैलेंद्र…

Read More

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एक जण ताब्यात…

बांदा पोलिसांची कारवाई; आठ लाखाचा मुद्देमाल ताब्यात ⚡बांदा ता.१५-: गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कारवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई केली . या कारवाईत 1 लाख 28 हजार 736 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 7 लाख रुपयांची गाडी असा एकूण 8 लाख 28 हजार 736 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर या प्रकरणाची सतीश विष्णू…

Read More

शामराव पेजे महामंडळ एकरकमी परतावा योजनेत व्याज रकमेवर 50 टक्के सवलत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: इतर मागासावर्गीय आर्थिक विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थींसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर 50 टक्के सवलत देण्यात येईल. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली.सदर ची योजना ठराविक कालावधीसाठी आहे….

Read More

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी इ.11 वी व इ.12 वी, विज्ञान या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी…

Read More
You cannot copy content of this page