गुरामवाडी ग्रामपंचायत येथे कायदे विषयक शिबिर संपन्न

मालवण दि प्रतिनिधी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका विधी सेवा समिती व वरची गुरामवाडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यालय, कट्टा येथे कायदेविषयक मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला मालवण वकील संघाचे सदस्य रुपेश परुळेकर, सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण, अॅड. प्रदीप मिठबावकर, अॅड. अक्षया वराडकर, माजी सरपंच सतीश वाईरकर, उपसरपंच शैलेंद्र शंकरदास, सदस्य मकरंद सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील गुराम, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

अॅड. प्रदीप मिठबावकर यांनी लोकअदालतीत निकाली काढण्यात येत असलेले तंटे, विवाह नोंदणी कायदा याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. अक्षया वराडकर यांनी महिलांबाबतचे कायदे आदींबाबत मार्गदर्शन केले. सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी न्यायालयीन प्रक्रिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची प्रक्रिया आदींबाबत माहिती दिली.

ॲड. रुपेश परुळेकर यांनी अनुसूचित जाती व जमाती यांचे अधिकार तसेच दुर्लक्षित घटकांचे अधिकार आदींबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार याबाबत कायदा, मुलांचे शिक्षण, आरोग्यबाबत कायदे व अधिकार या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी जास्तीत जास्त लोकअदालतीमध्ये आपले खटले तडजोडीने निकाली होण्याकरिता दाखल करावेत, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page