बांदा पोलिसांची कारवाई; आठ लाखाचा मुद्देमाल ताब्यात
⚡बांदा ता.१५-: गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कारवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई केली . या कारवाईत 1 लाख 28 हजार 736 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 7 लाख रुपयांची गाडी असा एकूण 8 लाख 28 हजार 736 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर या प्रकरणाची सतीश विष्णू गावडे (रा.वागदे, कणकवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई सोमवारी रात्री 9 च्या सुमारास बांदा दत्त मंदिर येथे केली.
याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,बांदा पोलिसांचे पथक गस्त घालीत असताना गोव्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान गोव्याहुन बांद्याच्या दिशेने येणारे (एमएच07एजी3669) एसक्रॉस गाडी तपासणी साठी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनवटीच्या विविध ब्रँडची दारू आढळून आली. याबाबत चालकाला विचारले असता लग्न कार्यक्रमसाठी जात असल्याचे सांगितले.
ही कारवाई सहा पोलिस निरीक्षक श्यामराव काळे, सहा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, प्रशांत पाटील, न्यानेश्वर हळदे आदीनि केली
