Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न.

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आखली व्यूहरचना ⚡ओरोस ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा काँग्रेस कार्यालय ओरोस जैतापकर काॅलनी येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींचा आढावा घेण्यात आला. निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांनी सांगीतले. प्रदेश…

Read More

मालडी येथील भावई मंदिरात हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात २० व २१ नोव्हेंबर या दोन दिवशी हरीनाम सप्ताह बहुसंख्य भाविकांच्या आणि माहेरवाशीणींच्या उपस्थितीत उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सप्ताहानिमित्त भावई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. या हरिनाम सप्ताहाची सुरुवात २० नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता होऊन यावेळी देवीची पूजा…

Read More

महिलांनी अर्थसत्ता, धर्मसत्ता, राज्यसत्ता हातात घेतली पाहिजे

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे आवाहन ⚡मालवण ता.२२-:जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी असे म्हटले जात असले तरी महिलांनी केवळ पाळण्याची दोरी सांभाळू नये. फक्त मुलं जन्माला घालणे एवढंच महिलेचे काम नसून पाळण्याच्या दोरीबरोबरच अर्थसत्ता, धर्मसत्ता, राज्य सत्ता अशा सत्तेच्या सर्व दोऱ्या आपल्या हाती ठेवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या…

Read More

गवारेडा अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी

⚡सावंतवाडी ता.२२-: माजगाव येथील भाईसाहेब सावंत यांच्या समाधीकडे गवारेडा अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार तरूण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.

Read More

न्हावेली देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ -: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारीत असलेल्या न्हावेली गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची तर सचिवपदी संजय दळवी यांची एकमताने निवड जाहिर करण्यात आली. न्हावेली येथे पार पडलेल्या बैठकीत उपसमितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली. मौजे न्हावेली गावचे देवस्थान श्री देव रवळनाथ, माऊली यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारणी आहे. नूतन कार्यकारणी…

Read More

सुषमा अंधारे यांनी कुणकेश्वर देवाचे घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून आलेल्या आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी सकाळी श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेत्या संजना घाडी, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष साक्षी प्रभू ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत ,महिला संघटक हर्षा ठाकूर, प्रगती तेली, तालुकाप्रमुख…

Read More

धनुर्विद्या स्पर्धेत प्रांजली वाडेकर प्रथम

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न देवगड (प्रतिनिधी)शासकीय शालेय क्रीडा अंतर्गत क्रीडा संकुल ओरोस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या कुमारी प्रांजली संजय वाडेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कुमारी प्रांजली हिस तिचे काका . जितेंद्र वाडेकर यांचे मार्गदर्शन…

Read More

उपनेत्या सुषमा अंधारे यांची देवगड संपर्क कार्यालयाला भेट

⚡देवगड ता.२२-: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शनासाठी आल्या असता त्यांनी देवगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत सत्कार देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत तालुकाप्रमुख मिलिंद साटम नगरसेवक निवृत्ती तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी रोहन…

Read More

रानबांबुळी येथे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता २२छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ( कृषिदुत) यांनी रानबांबुळी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत विविध प्रात्याक्षिके करून दाखवली. यावेळी कृषीदुतांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्यांचे फायदे, माती परीक्षण का करावे, नवीन अवजारांची ओळख, पीक नियोजन व शेती विषयक शासनाच्या विविध योजना, पाणी व्यवस्थापन, बीज उगवण…

Read More

पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी सुमेध गावडे यांचे उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता २२गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान गाडी सोडून देत त्या ऐवजी दुसऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी कोलगाव येथील सुमेध गावडे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. दरम्यान या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला…

Read More
You cannot copy content of this page