सुषमा अंधारे यांनी कुणकेश्वर देवाचे घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून आलेल्या आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी सकाळी श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेत्या संजना घाडी, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष साक्षी प्रभू ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत ,महिला संघटक हर्षा ठाकूर, प्रगती तेली, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, नगरसेवक निवृत्ती (बुवा )तारी गणेश वाळके,संजय वाळके, गणेश गावकर उपस्थित होते.
या भेटी च्या निमित्ताने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी,सचिव शरद वाळके,खजिनदार अभय पेडणेकर,सदस्य संतोष लाड, अजय नाणेकर, संजय आचरेकर व्यवस्थापक रामदास तेजम यांच्या उपस्थितीत श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा श्री देव कुणकेश्वर मंदिर प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी उपनेत्या संजना घाडी, जिल्हा संघटक जन्हवी सावंत, यांचा सन्मान करण्यात आला. श्री क्षेत्र कुणकेश्वर दौऱ्यात सुषमा अंधारे यांनी श्री देव कुणकेश्वराची पूजा करून आरती केली व दर्शन घेतले. यानंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर परिसराची पाहणी करून देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधला. याबरोबरच कुणकेश्वर बीचवर फेरफटका मारून बीच वरील समुद्राच्या पाण्यात लपलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. प्रसंगी त्याविषयी माहिती जाणून घेतली .या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी आपण यापूर्वी देखील कुणकेश्वर या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले होते व त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आपण श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी देवदर्शनाकरिता आलो असून या ठिकाणी पर्यटन विकास अंतर्गत श्री क्षेत्र कुणकेश्वर चे बदललेले चित्र पाहता या संपूर्ण बदललेल्या चित्रात शिवसेना महाविकास आघाडीचे मोठे योगदान असून शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुणकेश्वर प्राप्त झालेल्या पर्यटन निधीमधून या भागाचा विकास झाल्याचे या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांकडून व ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळाले याचा अर्थ श्री क्षेत्र कुणकेश्वर चा विकास हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला असल्याने आपल्याला वेगळेच समाधान या दौऱ्याच्या निमित्ताने मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले या पुढील काळात देखील श्रींक्षेत्र कुणकेश्वर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याकरता आपण शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्फत अधिकाधिक प्रयत्न करण्यात येतील असे अभिवचन ही त्यांनी या निमित्ताने दिले. या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून देवगड पोलीस स्थानकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहा. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल जोशी, पोलीस हवालदार फकरुद्दीन आगा,पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर,पोलीस कॉन्स्टेबल विशाल वैजल ,निलेश पाटील ,महिला पोलीस हवालदार अनविता कदम यांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.

You cannot copy content of this page