⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ -: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारीत असलेल्या न्हावेली गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची तर सचिवपदी संजय दळवी यांची एकमताने निवड जाहिर करण्यात आली.
न्हावेली येथे पार पडलेल्या बैठकीत उपसमितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली. मौजे न्हावेली गावचे देवस्थान श्री देव रवळनाथ, माऊली यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारणी आहे. नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष आनंद नाईक सचिव संजय दळवी खजिनदार गितेश परब, सदस्य अनंत परब, भिवा नाईक, लाडू नाईक, मोहन नाईक, गंगाराम मेस्री,सदानंद न्हावेलकर,अर्जुन नाईक,सगुण नाईक, दिगंबर नाईक, विठोबा गावडे, राजन कालवणकर, उदय पार्सेकर, यांचा समावेश आहे.
