धनुर्विद्या स्पर्धेत प्रांजली वाडेकर प्रथम

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न

देवगड (प्रतिनिधी)
शासकीय शालेय क्रीडा अंतर्गत क्रीडा संकुल ओरोस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या कुमारी प्रांजली संजय वाडेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कुमारी प्रांजली हिस तिचे काका . जितेंद्र वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.कुमारी.प्रांजलीचे प्रशालेचे संस्थाध्यक्ष एडवोकेट अजितराव गोगटे,कार्यवाह प्रवीण जोग ,मुख्याध्यापिका मराठे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो-अभिनंदन करताना मान्यवर

You cannot copy content of this page