पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी सुमेध गावडे यांचे उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता २२
गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान गाडी सोडून देत त्या ऐवजी दुसऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी कोलगाव येथील सुमेध गावडे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. दरम्यान या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे सांगत तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील सुमेध गावडे याने दिला आहे.

जुलै २०२२ मध्ये बांदा पोलिसांनी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी एक आलिशान कार पकडली होती. मात्र ती कार लगेच सोडण्यात आली. मात्र त्या आलिशान कार ऐवजी त्या ठिकाणी दुसरी कार दाखवून कारवाईचा सोपस्कर पूर्ण करण्यात आला असल्याचा आरोप सुमेध गावडे यांनी केला आहे. यासाठी गावडे यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान गाडी सोडून देत त्या ऐवजी दुसऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. यावेळी जिल्हा दौऱ्यावर असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी यावर योग्यता कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोकण परीक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक यांनीही याबाबत योग्यती कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मात्र त्या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सुमेध गावडे यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे सांगत तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील सुमेध गावडे याने दिला आहे.

You cannot copy content of this page