सिंधुदुर्गनगरी ता २२
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ( कृषिदुत) यांनी रानबांबुळी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत विविध प्रात्याक्षिके करून दाखवली.
यावेळी कृषीदुतांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्यांचे फायदे, माती परीक्षण का करावे, नवीन अवजारांची ओळख, पीक नियोजन व शेती विषयक शासनाच्या विविध योजना, पाणी व्यवस्थापन, बीज उगवण क्षमता चाचणी, जनावरांच्या चाऱ्यावरती प्रक्रिया कशी करावी, फळबाग तसेच विविध फळझाडांचे कलम कसे करावे, इत्यादी प्रात्यक्षिक करून दाखविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी कृषीदूत यांनी शेतकऱ्याना कृषि विषयक अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. या बाबत शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य वाय ए पेडणेकर , कार्यक्रम समन्वयक प्रा. एन ए साईल (कृषी अभियांत्रिकी), प्रा.जी डी गायकी (कृषी विस्तार व शिक्षण), प्रा. महेश परुळेकर (कृषीशास्त्र) , प्रा. एन बी तांबिटकर (वनस्पतीशास्त्र), प्रा.व्ही व्ही राणे (कृषी अर्थशास्त्र) प्रा. पी जी ओगले (वनस्पती रोगशास्त्र), प्रा. व्ही एन खरात (कीटकशास्त्र) ,प्राध्यापिका एन पी सामंत (पशुविज्ञान) ,प्राध्यापिका बी एस पाताडे (उद्यानविद्या) ,प्राध्यापिका डॉ. एम् व्ही अपराज (मृदा विज्ञान) यांनी केले.
