Headlines

कणकवलीत ४९२पैकी ७३ सदस्य तर वायंगणी व शिडवणे सरपंचही बिनविरोध

वायंगणी, ओझरम व पियाळी ग्रामपंचायती बिनविरोध;दुरंगी लढतीवर भर ⚡कणकवली ता.०४-:कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे जोरदार पडघम वाजू लागले असून प्राप्त अर्जानुसार वायंगणी व शिडवणे ही दोन सरपंचपदे बिनविरोध तर वायंगणी, ओझरम व पियाळी या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे दिसत आहे. तसेच एकूण ४९२ सदस्यांपैकी ७३ सदस्यपदे बिनविरोध झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत चित्र ७…

Read More

तळेरे येथील ‘मधुकट्टयाचे’ पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते अनावरण

⚡कणकवली ता.०४-:“मधुकट्टया” च्या माध्यमातून मधुसूदन नानिवडेकर यांची एक सुंदर स्मृती जागवून हे एक मोठी साहित्यिक चळवळ सुरु केली आहे.यातुन आपण सर्वजण मधूवरती निस्सीम प्रेम करणारे आहात हे लक्षात येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी तळेरे येथे केले.  यावेळी बोलताना कर्णिक म्हणाले की, कविता करणे म्हणजे वीज पकडणे.ती विज मधुसूदन नानिवडेकर यांनी…

Read More

तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीची जत्रा 7 डिसेंबर रोजी

⚡कणकवली ता.०४-: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी येथील श्री. सिद्ध सातेरी देवीची जत्रा बुधवार 7 डिसेंबर रोजी होत आहे. ही जत्रा माहेरवाशिणींची जत्रा म्हणून ओळखली जाते. तांब्याचीवाडी या गावची जत्रा म्हणजे हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील असून या गावचा संपर्क मात्र कोकणशी जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या गावातील रितीपरंपरा या कोकणातील गावांप्रमाणे असतात. गावात दसरा, गणपती,…

Read More

अर्चना घारे परब यांचा वाढदिवस दयासागर छात्रालय येथे साजरा

⚡बांदा ता.०४-: राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे-परब यांचा वाढदिवस गुरुवार,दि.१ डिसेंबर रोजी मडुरे,सावंतवाडी येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नयीचे दयासागर छात्रालय सेवापाल येथे येथील विद्यार्थी आणि शिक्षकासोबत अतिषय उत्साहात साजरा झाला. दरम्यान अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले.

Read More

रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील युवकाचा जागीच मृत्यू…

काल सायंकाळची घटना; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.. सावंतवाडी ता.०४ : रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की सोनुर्ली येथील युवक हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा…

Read More

विजयदुर्ग बंदराचा विकास आवश्यक

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची इच्छा देवगड प्रतिनिधीविजयदुर्ग बंदर विकसीत झाले तर येथील हापूस आंब्याला मोठया प्रमाणात परदेशातून मागणी वाढु शकते यामुळे ठराविक देशांमध्ये जाणारा हापूस आंबा अखंड जगभर पोहचून आंब्याला चांगला भाव मिळु शकतो यामुळे विजयदुर्ग बंदर विकसित होणे गरजेचे आहे. असे मत बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी देवगड येथे व्यक्त केले.देवगड बाळासाहेबांची शिवसेना कार्याल्यामध्ये बिग्रेडियर…

Read More

पाच ग्राम पंचायतसाठी प्रत्येकी एक अर्ज

बिनविरोध निवड होणार;५५ सरपंच पदासाठी १८२ अर्ज मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची निवडणुक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १८२ अर्ज तर सदस्य पदासाठी एकूण ८४८ अर्ज दाखल झाले. यामध्ये साळेल, आमडोस, काळसे, घुमडे, कातवड पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाले असून सदस्य पदासाठीही या पाच ग्रा.प….

Read More

मालवण येथे डिव्यांग समता सप्ताहाचा शुभारंभ

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत भंडारी हायस्कूल येथे आयोजन मालवण दि प्रतिनिधी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती मालवणच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग समता सप्ताहाचा शुभारंभ मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दिव्यांग सप्ताहनिमित्त मालवण शहरात…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी नीलम शिंदे व संजना हळदिवे

⚡मालवण ता.०३-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी मालवण मधील नीलम शिंदे व कणकवली मधील संजना हळदिवे यांची निवड करण्यात आली आहे. नीलम शिंदे यांच्यावर मालवण कुडाळ तालुक्याची तर संजना हळदिवे यांच्यावर कणकवली वैभववाडी या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली असून देवगड तालुक्याची जबाबदारीही या दोघांवर एकत्रित रित्या सोपविण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जिल्ह्यातून…

Read More

बँ नाथ पै विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे

व्यापारी संघाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) नुकताच सुरू झालेला सिंधुदुर्गचा चिपी येथील बॅ. नाथ पै विमानतळ बंद पाडण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे जाणवू लागले आहे. चिपी मुंबई ही नियमित सेवा कमी करण्यात आली आहे त्यामुळे याबाबत आवाज उठवून बॅ. नाथ पै चिपी विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू करण्यास शासनाला भाग पाडावे अशी…

Read More
You cannot copy content of this page