वायंगणी, ओझरम व पियाळी ग्रामपंचायती बिनविरोध;दुरंगी लढतीवर भर
⚡कणकवली ता.०४-:
कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे जोरदार पडघम वाजू लागले असून प्राप्त अर्जानुसार वायंगणी व शिडवणे ही दोन सरपंचपदे बिनविरोध तर वायंगणी, ओझरम व पियाळी या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे दिसत आहे. तसेच एकूण ४९२ सदस्यांपैकी ७३ सदस्यपदे बिनविरोध झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत चित्र ७ डिसेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे.
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ५८
सरपंचपदाकरीता २२३ उमेदवार रिंगणात आहेत. तर ४९२ सदस्यसंख्येसाठी ११०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी दि. ५ डिसेंबर रोज
होणार असून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख ७ डिसेंबर आहे.
७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायती
कणकवली तालुक्यात सात सदस्य असलेल्या ३१ ग्रामपंचायती आहेत. असलदेच्या सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्यपदांसाठी २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आयनल सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदांसाठी १५, आशिये सरपंच पदासाठी ३ तर सदस्यपदांसाठी ९ अर्ज दाखल असून ५ सदस्य बिनविरोध होणार आहेत. भरणी सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १२ अर्ज असून दोन सदस्य बिनविरोध होणार आहेत. चिंचवली सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी ९ उमेदवार असून पाच सदस्य बिनविरोध होणार आहेत. दारूममध्ये सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २० दारिस्ते सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १८, डामरे सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १३ अर्ज दाखल असून एक सदस्या बिनविरोध होणार आहे. करंजे सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी १४ करूळ सरपंपदासाठी २ सदस्यपदासाठी १० अर्ज असून चार बिनविरोध होणार आहेत. कासरल सरपंपदासाठी ४ व सदस्यपदासाठी १६, कुंभवडे सरपंपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १५, कुरंगवणे सरपंपदासाठी ३ व सदस्यपदासाठी ११ उमेदवार असून ३ जागा बिनविरोध होणार आहेत. कोळोशी सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी १५, कोंडये सरपंपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १२ उमेदवार असून दोन जागा बिनविरोध होणार आहेत. माईण सरपंपदासाठी २ व सदस्यपदासाठी १४ नडगिवे सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी ११ उमेदवार असून तीन जागा बिनविरोध होणार आहेत. नागवे सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १८, ओझरम सरपंचपदासाठी ३ व तर सदस्यपदासाठी ७ अर्ज आल्याने या जागा बिनविरोध होणार आहेत. पियाली सरपंचपदासाठी ५ असून सदस्यपदासाठी ७ अर्ज आल्याने ते बिनविरोध होणार आहेत. पिसेकामते सरपंचपदासाठी २ सदस्यपदासाठी ८ अर्ज आल्याने सहा जागा बिनविरोध होणार आहेत. शेर्पे सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी १४ शिडवणे सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असून सरपंच निवड बिनविरोध होणार आहे. तर सदस्यपदासाठी ८ अर्ज असून सहा सदस्य बिनविरोध होणार आहेत. शिरवल सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १५, सावडाव सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १६ साकेडी सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी १६, साळीस्ते सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी १० अर्ज असून चार जागा बिनविरोध होणार आहेत. सातरल सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी १६. तिवरे सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी १५ वायंगणी सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असून ती जागा बिनविरोध होणार आहे. तर सातपैकी सहा सदस्यांनी अर्ज भरले असल्याने ते बिनविरोध होणार असून एका जागेसाठी अर्ज आलेला नाही. वाघेरी सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी १७ अर्ज आले आहेत,
९ सदस्यांसाठी चुरस
नऊ सदस्य असलेल्या १८ ग्रामपंचायतींमध्ये बोर्डवे सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २१, बिडवाडी सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी १९, दिवगळे सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी २३. घोणसरी सरपंचपदासाठी ८ व सदस्यपदासाठी २०, हरकुळ खुर्द सरपंचपदासाठी ६ सदस्यपदासाठी २५, हळवल सरपंपदासाठी ४ व सदस्यपदासाठी २४, हुंबरठ सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी १३ उमेदवार असून ५ जागा बिनविरोध होणार आहेत. जानवली सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी ३३, कसवण- तळवडे सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदसाठी १८, लोरे सरपंपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २२ नरडवे सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी २१, ओसरगांव सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २५, शिवडाव सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी २३, तळेरे सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी १४ अर्ज असून पाच जागा बिनविरोध होणार आहेत. तरंदळे सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी २० वागदे सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी २३, वारगांव सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून दोन जागा बिनविरोध होणरा आहेत. वरवडे सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी २५ अर्ज दाखल झाले आहेत.
११ सदस्यसाठी लढाई
११ सदस्य असलेल्या सहा ग्रामपंचायतीत हरकुळ बुद्रुक सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी २९, कळसुली सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी २७ नाटळ सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी २८, नांदगाव सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी ३२ सांगवे सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी ३९ खारेपाटण सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी २९ अर्ज दाखल आहेत.
१३ सदस्यांची एकमेव ग्रा.प.
१३ सदस्य असलेली कासार्डेच्या सरपंचपदासाठी ९ व सदस्यपदासाठी २९ अर्ज दाखल आहेत.
फोंडाघाट व कलमठमध्ये चुरस
१७ सदस्य असलेल्यांत कलमठ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ७ व सदस्यपदासाठी ४४ तर फोंडाघाट सरपंचपदासाठी ८ तर सदस्यपदासाठी ५५ अर्ज दाखल झाले आहेत.कणकवली तालुक्यात
फोंडाघाट व कलमठ या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये जोरदार चुरस होणार असल्याचे चित्र आहे.
