पाच ग्राम पंचायतसाठी प्रत्येकी एक अर्ज

बिनविरोध निवड होणार;५५ सरपंच पदासाठी १८२ अर्ज

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची निवडणुक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १८२ अर्ज तर सदस्य पदासाठी एकूण ८४८ अर्ज दाखल झाले. यामध्ये साळेल, आमडोस, काळसे, घुमडे, कातवड पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाले असून सदस्य पदासाठीही या पाच ग्रा.प. मध्ये प्रत्येकी सात अर्ज दाखल झाले आहेत. या ग्रामपंचायती मध्ये सातच जागा निवडून यायच्या असल्याने या पाचही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचे अंतिम चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत किर्लोस, पळसंब, ओवळीये, शिरवंडे, वायंगवडे, आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ या सहा ठिकाणी थेट दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. तर बहुरंगी लढतींमध्ये निरोम, मठ बुद्रुक, बुधवळे- कुडोपी, असरोंडी, बांदिवडे बुद्रुक, कोळंब, हडी, रेवंडी, वडाचापाट, नांदरुख, तिरवडे, तळगाव, खोटले, वरची गुरामवाडी, आंबेरी, देवली येथे सरपंच पदांसाठी ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कांदळगावमध्ये तब्बल ६, देवबागमध्ये ८, वायरी भूतनाथ ७, हेदूळ, नांदोस, त्रिंबक, हिवाळे याठिकाणी प्रत्येकी ५ उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

मालवण तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५५, ७१६ इतके मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यात २८ हजार ४४८ स्त्री, तर २७ हजार २६८ पुरुष मतदार आहेत. ५५ गावांसाठी सरपंच व सदस्य निवडण्याची जबाबदारी या मतदारांवर आहे. सरपंच पद हे थेट जनतेतून निवडण्यात येणार असून सदस्य पदांसाठी वॉर्ड रचना आणि आरक्षण काढण्यात आले आहे. ही निवडणूक मुक्त चिन्हांवर होणार आहे. तालुक्यात १६६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे एक हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ५ डिसेंबर रोजी छाननी, ७ रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत व त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मत्तदान होणार आहे. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. मालवण तालुक्याची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार आहे, अशी माहिती तहसीलदार आनंद मालवणकर यांनी दिली.

निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्जांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रावण- सरपंच- ३, सदस्य १८, निरोम- सरपंच ४, सदस्य- १८, रामगड – सरपंच ४, सदस्य १९, मठबुद्रुक – सरपंच ४, सदस्य १५, बुधवळे कुडोपी- सरपंच ४, सदस्य १२, गोठणे- सरपंच ३, सदस्य १३, किर्लोस- सरपंच २, सदस्य १७, असगणी – सरपंच ३, सदस्य १२, राठीवडे – सरपंच ३, सदस्य १४, त्रिंबक – सरपंच ५, सदस्य १७, पळसंब- सरपंच २, सदस्य ७, हिवाळे- सरपंच ५, सदस्य १०, ओवळीये- सरपंच २, सदस्य १७, शिरवंडे – सरपंच २, सदस्य ११, असरोंडी- सरपंच ४, सदस्य २२, बांदिवडे बुद्रुक – सरपंच ४, सदस्य १२, बांदिवडे खुर्द कोईल – सरपंच ०, सदस्य ५, तोंडवळी – सरपंच ३, सदस्य २१, वायंगणी – सरपंच ३, सदस्य २५, कोळंब – सरपंच ४, सदस्य २८, हडी- सरपंच ४, सदस्य २४, कांदळगाव – सरपंच ६, सदस्य २०, महान – सरपंच ३, सदस्य १४, रेवंडी- सरपंच ४, सदस्य ९, सर्जेकोट मिर्याबांदा – सरपंच ३, सदस्य १४, वेरळ- सरपंच ३, सदस्य १७, माळगाव – सरपंच ३, सदस्य १७, मालोंड – सरपंच ३, सदस्य १३, पोईप – सरपंच ३, सदस्य १८, वडाचापाट – सरपंच ४, सदस्य २१, साळेल- सरपंच १, सदस्य ७, चाफेखोल – सरपंच ३, सदस्य १२, आमडोस- सरपंच १, सदस्य ७, नांदरुख – सरपंच ४, सदस्य १३, सुकळवाड- सरपंच ३, सदस्य २४, नांदोस- सरपंच ५, सदस्य १९, तिरवडे- सरपंच ४, सदस्य २०, हेदूळ- सरपंच ५, सदस्य १४, तळगाव- सरपंच ४, सदस्य २१, खोटले- सरपंच ४, सदस्य ६, वायंगवडे- सरपंच २, सदस्य १४, वराड- सरपंच ३, सदस्य १३, वरची गुरामवाडी- सरपंच ४, सदस्य १८, काळसे- सरपंच १, सदस्य ९, धामापूर- सरपंच ३, सदस्य १६, आंबेरी- सरपंच ४, सदस्य १०, देवली – सरपंच ४, सदस्य १५, चौके – सरपंच ३, सदस्य २१, घुमडे- सरपंच १, सदस्य ७, कुंभारमाठ- सरपंच ३, सदस्य १६, कातवड- सरपंच १, सदस्य ७, आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ- सरपंच २, सदस्य १०, देवबाग- सरपंच ८, सदस्य २३, तारकर्ली- सरपंच ३, सदस्य १८, वायरी भूतनाथ- सरपंच ७, सदस्य २२.

You cannot copy content of this page