Headlines

सावंतवाडी दोडामार्ग मर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धा

नट वाचनालयाचे २४ डिसेंबर रोजी आयोजन बांदा/प्रतिनिधीमुलांमध्ये आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे, त्यांच्यात शालेय नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी येथील नट वाचनालयाच्या वतीने (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित ‘नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक २४…

Read More

झाराप-पत्रादेवी महामार्गावर वेत्ये येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी

रुग्णवाहिका चालक स्वप्नील ठाकूर यांनी केले बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल ⚡सावंतवाडी ता.०७ सहदेव राऊळ : झाराप-पत्रादेवी महामार्गावर मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची खबर मिळताच त्यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक स्वप्नील ठाकूर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. हा अपघात आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वेत्ये येथील सर्कल…

Read More

सद्गुरु धर्मराज महाराज यांचा शुक्रवारी 104 वा जयंती सोहळा

⚡कणकवली ता.०७-: परमहंस भालचंद्र महाराजांच्या सानिध्यात राहून त्या तपोबलाने अनेकांचे जीवन सुखमय व समृध्द करणारे महामेरु श्री सद्गुरु धर्मराज महाराज यांचा 104 वा. जयंती सोहळा शुक्रवार 9 डिसेंबर रोजी बालगोपाळ हनुमान मंदीर कणकवली (परमपुज्य सद्गुरु श्री धर्मराज महाराज समाधीस्थान) येथे साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10…

Read More

गोव्यातून महाराष्ट्र होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली.

गोवा अबकारी खात्याची पत्रादेवी नाक्यावर २ ट्रकांवर कारवाई;४० लाखांचा मुद्देमाल जप्त ⚡बांदा ता.०७-: गोव्यातून महाराष्ट्र व गुजरात मध्ये ट्रक मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात गोवा अबकारी खात्याने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत तब्बल ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक समीर सरदार शेख (वय ३३, रा. उस्मानाबाद) याला ताब्यात घेण्यात आले. तर…

Read More

जिल्ह्यात भाजपचे ३० सरपंच आले बिनविरोध निवडून

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा ⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हातून अंदाजे ४४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून यातील ३० पॅनल म्हणजे ३० सरपंच भाजपचे निवडून आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान, यावेळी केंद्र व राज्यातील भाजप नेत्यांनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी लावणार असल्याचा विश्वास यावेळी तेली यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार…

Read More

बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कथाकथन व गीतगायन स्पर्धा

⚡मालवण ता.०७-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित सानेगुरूजी वाचन मंदिर धुरीवाडा मालवण येथे तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धा १० व ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित करण्यात आली आहेत. कथाकथन स्पर्धा – विभाग पहिला बालवाडी चिऊकाऊच्या गोष्टी (३ ते ५ मिनिटे), विभाग दुसरा पहिली ते…

Read More

मळगाव येथे १२ डिसेंबर रोजी कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर जयंती कार्यक्रम

⚡सावंतवाडी ता.०७-: सहदेव राऊळ :* मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांचा जयंती कार्यक्रम सोमवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाचन मंदिराच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास कलावलय” वेंगुर्ला उपाध्यक्ष “व भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी संजय पुनाळेकर व बॅ. बाळासाहेब…

Read More

तुळस येथे जिल्हास्तरीय दौड स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०७- : सध्या जागतिक तापमान वाढीचा अनिष्ट परिणाम जगावर होत असून विस्कटलेली घडी योग्य बसवण्यासाठी जंगल आणि प्राणी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ‘जंगल वाचवा, प्राणी वाचवा‘ हा संदेश देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने जिल्हास्तरीय दौड स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता वेताळ मंदिर तुळस-खरीवाडा…

Read More

माडखोल येथील ठाकरे शिवसेनेचे तीन ग्राम पंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

महाविकास आघाडीला धक्का ⚡सावंतवाडी ता.०७- : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडखोलमध्ये महाविकास आघाडीला मोठ खिंडार पडलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी ग्रा.प.सदस्य सिद्धेश शिरसाट, समृद्धी शिरसाट, अनिता अनिल राऊळ यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप नेते महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला. यातील समृद्धी शिरसाट, अनिता अनिल राऊळ हे ग्रामपंचायतीसाठी…

Read More

वेंगुर्ला ते पावस पालखी सोहळा १३ डिसेंबर पासून

⚡वेंगुर्ला ता.०७-: रत्नागिरी-पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंद महाराजांच्या २० डिसेंबर रोजी होणा-या जन्मोत्सवासाठी वेंगुर्ला येथून १३ डिसेंबर रोजी पालखी निघणार आहे. यावर्षीचा हा ४७वा पालखी सोहळा आहे.

Read More
You cannot copy content of this page