सद्गुरु धर्मराज महाराज यांचा शुक्रवारी 104 वा जयंती सोहळा

⚡कणकवली ता.०७-: परमहंस भालचंद्र महाराजांच्या सानिध्यात राहून त्या तपोबलाने अनेकांचे जीवन सुखमय व समृध्द करणारे महामेरु श्री सद्गुरु धर्मराज महाराज यांचा 104 वा. जयंती सोहळा शुक्रवार 9 डिसेंबर रोजी बालगोपाळ हनुमान मंदीर कणकवली (परमपुज्य सद्गुरु श्री धर्मराज महाराज समाधीस्थान) येथे साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 ते 12.30 समाधीपूजन व लघुरुद्र, दुपारी 12.30 ते 1 आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायं. 5 ते 8 भजनांचा भरगच कार्यक्रम रात्रौ 8.30 ते 9 दीपोत्सव व आरती असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या जयंती सोहळयाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालगोपाळ हनुमान मंदीर, कांबळेगल्ली कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page