झाराप-पत्रादेवी महामार्गावर वेत्ये येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी

रुग्णवाहिका चालक स्वप्नील ठाकूर यांनी केले बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

⚡सावंतवाडी ता.०७ सहदेव राऊळ : झाराप-पत्रादेवी महामार्गावर मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची खबर मिळताच त्यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक स्वप्नील ठाकूर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.


हा अपघात आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वेत्ये येथील सर्कल येथे झाला. बापू आईर (३३) असं जखमीच नाव आहे. बापू आईर हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एम एच ०७ एपी ४३७४) घेउन झाराप येथून बांदा येथे जात होते दरम्यान वेत्ये सर्कल येथे त्यांची मोटासायकल स्लीप होऊन अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ स्वप्नील ठाकूर यांनी
सावंतवाडी गवळी तिठा येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणाऱ्या मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने प्रा आ केंद्र बांदामध्ये दाखल केले. त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page