माडखोल येथील ठाकरे शिवसेनेचे तीन ग्राम पंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

महाविकास आघाडीला धक्का

⚡सावंतवाडी ता.०७- : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडखोलमध्ये महाविकास आघाडीला मोठ खिंडार पडलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी ग्रा.प.सदस्य सिद्धेश शिरसाट, समृद्धी शिरसाट, अनिता अनिल राऊळ यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप नेते महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला. यातील समृद्धी शिरसाट, अनिता अनिल राऊळ हे ग्रामपंचायतीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार असून त्यांच्या भाजप प्रवेशानं ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे.

दरम्यान, माडखोल विविध कार्यकारी सोसायटीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टी या प्रवेशामुळे निवडून येईल असा विश्वास सोसायटी चेअरमन जीजी राऊळ यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक मनोज नाईक, सरपंच संघटना उपाध्यक्ष विनोद राऊळ, माडखोल सरपंच बाळु शिरसाट, सोसायटी चेअरमन जीजी राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, संजय राऊळ, प्रकाश नाईक, शैलेश राऊळ, अनिल परब, विकास म्हाडेश्वर, सत्यविजय तावडे, भाऊ कोळमेकर, अमित राऊळ, अजय सावंत, उदय नाईक, आनंद नेवगी, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page