वेंगुर्ला ते पावस पालखी सोहळा १३ डिसेंबर पासून

⚡वेंगुर्ला ता.०७-: रत्नागिरी-पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंद महाराजांच्या २० डिसेंबर रोजी होणा-या जन्मोत्सवासाठी वेंगुर्ला येथून १३ डिसेंबर रोजी पालखी निघणार आहे. यावर्षीचा हा ४७वा पालखी सोहळा आहे.

  मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. दिलीप सामंत (भटवाडी) यांच्या विठ्ठल मंदिरातून पालखी प्रस्थान करणार आहे. शहरातील प्रमुख मंदिरांना भेट देत रात्रै दाभोसवाडा विठ्ठल मंदिर येथे ही पालखी वास्तव्यास असणार आहे. दि.१४ रोजी वेतोरे, कुडाळ, दि.१५ रोजी हुमरमळा, कसाल, कणकवली, दि.१६ रोजी हुमरट, नांदगांव, तळेरे, वारगांव, खारेपाटण, हातीवले, दि.१७ रोजी राजापूर विठ्ठल मंदिर, ओणी, वाटूळ, कुवे, लांजा, दि.१८ रोजी कुरणे, पुनस, दि. १९ रोजी सुकादेवी, सापुचे तळे, पावस येथे पालखी थांबणार आहे. दि. २० रोजी स्वामींचा जन्मोत्सव आणि दि.२१ रोजी पुन्हा पालखी वेंगुर्ला येथे येणार आहे. तरी या पालखी सोहळ्यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सदानंद गिरप यांच्याशी संफ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page