⚡वेंगुर्ला ता.०७- : सध्या जागतिक तापमान वाढीचा अनिष्ट परिणाम जगावर होत असून विस्कटलेली घडी योग्य बसवण्यासाठी जंगल आणि प्राणी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ‘जंगल वाचवा, प्राणी वाचवा‘ हा संदेश देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने जिल्हास्तरीय दौड स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता वेताळ मंदिर तुळस-खरीवाडा येथे होणार आहे.
या स्पर्धेत खुल्या पुरुष व महिलांसोबत इयत्ता पहिली ते दहावी मुली-मुलगे अशा एकूण १२ गटांमध्ये होणार असून विजेत्यांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शालेय गटात सहभागी होणा-या स्पर्धकांनी ओळखपत्र किंवा शाळेचे शिफारस पत्र आणणे आवश्यक आहे. नावनोंदणी महेश राऊळ (९४०५९३३९१२) किवा प्रदीप परुळकर (९५५२४३६४७७) यांच्याकडे करावी.
