⚡सावंतवाडी ता.०७-: सहदेव राऊळ :* मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांचा जयंती कार्यक्रम सोमवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाचन मंदिराच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास कलावलय” वेंगुर्ला उपाध्यक्ष “व भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी संजय पुनाळेकर व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद बांदेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी शेखर पाडगावकर हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमास उदय प्रेमी, ग्रंथप्रेमी, ग्रंथालयीन वाचक हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने करण्यात आले आहे.
