बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कथाकथन व गीतगायन स्पर्धा

⚡मालवण ता.०७-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित सानेगुरूजी वाचन मंदिर धुरीवाडा मालवण येथे तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धा १० व ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित करण्यात आली आहेत.

कथाकथन स्पर्धा – विभाग पहिला बालवाडी चिऊकाऊच्या गोष्टी (३ ते ५ मिनिटे), विभाग दुसरा पहिली ते दुसरी – अनितीकथा, चातुर्यकथा ( ५ मिनिटे), विभाग तिसरा – तिसरी ते चौथी सानेगुरुजी लिहिलेल्या गोष्टी / देशभक्तांच्या कथा (५ मिनिटे), चौथा गट – पाचवी ते सातवी – विज्ञानकथा/ भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी कोणत्याही एका रणरागिणीची कथा (५ मिनिटे), पाचवा गट- आठवी ते दहावी बॅ. नाथ पै यांच्या जीवनप्रसंगकथा / कोणत्याही एका समाजसेवकाची कथा ( ७ मिनिटे) गीतगायन स्पर्धा पहिला विभाग – बालवाडी – बडबडगीते (किमान ३ ते ५ मिनिटे), विभाग दुसरा – पहिली ते दुसरी – भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपरगीत, नाट्यगीत यापैकी एक गीत निवडावे (किमान ३ ते ५ मिनिटे), तिसरा विभाग – तिसरी ते चौथी – भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत, नाट्यगीत यापैकी एक गीत निवडावे (किमान ३ ते ५ मिनिटे), चौथा गट पाचवी ते सातवी भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपरगीत, नाट्यगीत यापैकी एक गीत निवडावे (किमान ३ तें ५ मिनिटे), पाचवा गट- आठवी ते दहावी भक्तीगीत, भावगीत, देशभक्ती परगीत, नाट्यगीत यापैकी एक गीत निवडावे (किमान ३ ते ५ मिनिटे) प्रत्येक सेवांगणमध्ये विभागात कथाकथनमध्ये स्पर्धक आणि गीतगायनमध्ये दोन स्पर्धक घेतले जातील.

प्रत्येक विभागातील पहिल्या तीन क्रमांकाना व एक उत्तेजनार्थ अशी चार पारितोषिके देण्यात येतील. गीत मराठी असावे, तोंडपाठ असावे गीत सादरीकरण साथीची आवश्यकता नाही. या स्पर्धा वैयक्तिक असतील. स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ८ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून अधिक माहितीसाठी ०२३६५- २५१२५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page