Headlines

कुडाळचा मुख्य रस्ता २४ मीटरसाठी सुधार समितीची हरकत

नागराध्यक्षाना दिले निवेदन

कुडाळ : कुडाळ शहरातून जाणारा हॉटेल अभिमन्यू ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा मुख्य रस्ता विकास आराखड्यात २४ मीटरचा दाखवण्यात आला आहे. त्याला कुडाळ सुधार समितीने हरकत घेतली आहे. २४ मीटर ऐवजी हा रस्ता ७ मीटर करावा अशी मागणी केली आहे. सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, सतीश वर्दम, बनी नाडकर्णी यांनी आज नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ शहराचा नवीन डीपी तयार करण्यात आला व दिनांक १० जून २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आला. अभिमन्यु हॉटेल ते आंबेडकर पुतळा हा २४ मिटर चा म्हणजे १२ x १२ मिटर विकास आराखडयात दाखवला गेला आहे तो आम्हांला मान्य नाही. आमची हरकत आहे. त्यामध्ये सदर गांव मौजे कुडाळ सर्वे नं. ३३६/० हि जमिन मिळकत आहे. सदर २४ मिटरच्या रस्त्यामुळे संपूर्ण बाजार पेठ उधवस्त होणार आहे.
सध्या MIDC चा रस्ता ७ × ७ मिटर केला असून ज्या ठिकाणी दुकानांचा विचार केला गेला तर तिथे ७ × ७ मिटर रस्ता होऊ शकतो, तर तुम्ही भर बाजार पेठेत १२ x १२ चा रस्ता कसा काय मंजूर करतात.
सदर आंबेडकर पुतळा ते जिजामाता चौक आहे. तिथे तडजोड केली पाहिजे आणि व्यापाराचे नुकसान होऊ नये याचा विचार करून सर्वांना विश्वासात घेऊन ७ × ७मिटर रस्ता करावा हि विनंती. सर्वांना म्हणजे व्यापारी, घरदार लोकांना घेऊनच मार्ग काढावा. सदरील रस्ता २४ मीटर रुंदीचा दाखविण्यात आलेला आहे. याकरिता आम्ही ही हरकत देत आहे. तरी आमच्या हरकतीचा विचार करुन दाखविण्यात आलेला २४ मीटर रुंदीचा रस्ता रद्द करुन नवीन ७ मीटर रुंदीचा रस्ता करुन डीपी करण्यात यावा, अशी मागणी कुडाळ सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नगराध्य्क्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका नयना मांजरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page