Headlines

सावंतवाडी पोलीस स्टेशनजवळ रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हटवले…

सावंतवाडी, ता. ३ : शहरातील पोलीस स्टेशनजवळील मुख्य रस्त्यावर आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास झाड तुटून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
याचवेळी त्या मार्गावरून जात असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ गाडीतून उतरून प्रसंगावधान दाखवत झाडाच्या फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले. फांद्या तोडून रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या कामात पोलीस कर्मचारी अनिल धुरी यांनीही सहकार्य केले. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, आशिष बांदिवडेकर आणि संदेश नाईक यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत झाड हटवून वाहनांसाठी मार्ग खुला केला.
कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत झाली. याबद्दल वाहनचालकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

You cannot copy content of this page