कुडाळ : तेंडोली-वरची आदोसवाडी येथे रामचंद्र राऊळ मित्रमंडळाच्यावतीने 4 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता तेथीलच कुलस्वामिनी मंदिरात “शिव अजमीढ संग्राम अथार्त अजमीढ शरसेतू” हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या कलाकारांचा या नाटकात समावेश आहे.
या नाटकातील कलाकार गणपती – प्रथमेश मेस्त्री, रिध्दी सिध्दी-सखाराम परब, शंकर-प्रशांत मयेकर, नारद- चारुहास मांजरेकर, राजा नल-मोरेश्वर सावंत, अजमीढ-सागर गावकर, सुभद्रा-सुधीर तांडेल, शतघुबडेश्वर-उदय मौर्य, वेसर-बाबा मयेकर, राम- दत्तप्रसाद शेणई, सुषेण-सुयश ठाकूर,
गरुड-महेंद्र कुडव, मारुती-गौरव शिर्के, तर खास आकर्षण वासुकीच्या भुमिकेत नवोदीत कलाकार-प्रणव खानोलकर आहे. संगीत साथ-हार्मोनियम-मयुर गवळी, पखवाज-किसन नेमळेकर,झांज- विनायक राऊळ यांची आहे. वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे विशेष सहाय्य आहे. नाट्यरसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामचंद्र राऊळ मित्रमंडळ (तेंडोली-वरची आदोस) यांनी केले आहे.
तेंडोली-वरची आदोसवाडी येथे उद्या संयुक्त दशावतार
