झाराप येथे ३ रोजी विश्वकर्मा जयंती
⚡वेंगुर्ला ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्यावतीने शुक्रवार दि.३ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या झाराप येथील कार्यालयात श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव आयोजित केला आहे.
⚡वेंगुर्ला ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्यावतीने शुक्रवार दि.३ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या झाराप येथील कार्यालयात श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव आयोजित केला आहे.
⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला-भटवाडी येथील रहिवासी प्रथमेश राजेंद्र वाडेकर याने अंतिम सीए परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला नं.४, ५वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला हायस्कूलमध्ये तर पुढील बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण त्याने पुणे येथे पूर्ण केले. फोटो – प्रथमेश वाडेकर
⚡वेंगुर्ला ता.०१-: जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं.१च्या भगतसिग स्काऊट पथकाच्यावतीने आडेली गावठाणवाडीच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात दोन दिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले.
⚡मालवण ता.०१-: मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मात्र मराठी भाषा संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातून मराठीचा जागर झाला पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन होणे महत्वाचे, असे प्रतिपादन प्रा. डॉ अंकुश सारंग यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात मार्गदर्शन…
⚡बांदा ता.०१-: रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालय इंग्लिश माध्यम प्रशालेने इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी प्रशालेचे ६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३ विद्यार्थी अ श्रेणीत, १६ विद्यार्थी ब श्रेणीत तर ३७ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेसाठी प्रशालेतून २४ विद्यार्थी बसले होते. पैकी एक…
ओरोस ता.०१-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत प्रथम वेंगुर्ला वजराठ नं 1 शाळेचा कर्तव्य तेजस बांदिवडेकर (286 गुण) आला, द्वितीय सावंतवाडी नं 2 चा दुर्वांक किशोर वालावलकर( 260गुण) व वेदांत तुकाराम पाटील साटेली भेडशी दोडामार्ग आले तर देवगड साळशी नं 1 ची…
⚡कणकवली ता.०१-: यंगस्टार मित्रमंडळाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने येथील विद्यामंदिर पटांगणावर १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान यंगस्टार चषक २०२३ या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत निमंत्रित १६ संघांचा सहभाग असणार आहे. विद्यामंदिराच्या पटांगणावर प्रकाशझोतात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला २५ हजार २७ रुपये व…
योग्य मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन सावंतवाडी ता.०१-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टानंतर अखेर निगुडे आसवेकर वाडीच्या बाजूला सुरू असलेले कालव्याचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली. कंपनीचे ठेकेदार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला तसेच पूर्णतः नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर या…
⚡सावंतवाडी ता.३१-: शहरात शिरोडा नाका येथे नव्याने सुरु केलेल्या श्री.सऊद मुजावर कुंटूबियाकच्या “फ्रेश बेक्स बेकर्स” या बेकरीचे आज दिमाखात उद्घाटन झाले. श्री मुजावर यांनी आपली पत्नी फिरदोस मुजावर याच्या हस्ते या बेकरीचे उद्घाटन केले. यावेळी मुजावर कुंटूबिय,नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली ६० वर्ष बेकरी व्यवसायात असलेल्या मुजावर कुटुंबियांनी सावंतवाडीत आपली नविन शाखा…
⚡सावंतवाडी ता.०१-: महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी माजगावात गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिल्ली येथील सेवाभावी संस्थेचे प्रियंका यांनी यांनी आज येथे सांगितल. यावेळी त्यांनी शिवणकामाची माहिती जाणून घेत महिलांना मार्गदर्शन केले. हे शिबिर माजगाव ग्रामपंचायत येथे सरपंच सौ अर्चना सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपसरपंच वेजरे, सदस्य संजय कानसे, अशोक धुरी, प्रज्ञा भोगण, विशाखा…