यंगस्टार आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरू

⚡कणकवली ता.०१-: यंगस्टार मित्रमंडळाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने येथील विद्यामंदिर पटांगणावर १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान यंगस्टार चषक २०२३ या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत निमंत्रित १६ संघांचा सहभाग असणार आहे. विद्यामंदिराच्या पटांगणावर प्रकाशझोतात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला २५ हजार २७ रुपये व यंगस्टार चषक तर उपविजेत्या संघाला २० हजार २७ व यंगस्टार चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय तृतीय व चतुर्थ संघ ५ हजार २७ रु., अष्टपैलू खेळाडूला २५२७ रु., उत्कृष्ट चढाई व पकडसाठी प्रत्येकी १०२७ रु., शिस्तबद्ध संघाला २०२७ रु. तसेच सर्वांना प्रत्येकी यंगस्टार चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी भव्य प्रेक्षक गॅलरीही उभारण्यात येणार आहे. स्पर्धा सायंकाळी ५ वा. नंतर सुरू होणार असून अधिक माहितीसाठी अण्णा कोदे (९४२२३८१९००) यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page